फलमाधूरी - पाककृती

फलमाधूरी, पाककला - [Phalmadhuri, Recipe] सर्व किंवा आवडती फळे घेवून त्यात गोड दही घालून बनवलेली पौष्टिक असलेली आणि सर्वच आवडीने खातील अशी ‘फलमाधूरी’ जेवणानंतर सर्व्ह करा.
फलमाधूरी - पाककला | Phalmadhuri - Recipe

सर्व फळांनी युक्त पौष्टिक अशी फलमाधूरी

‘फलमाधूरी’साठी लागणारा जिन्नस

 • अर्धी वाटी बारीक चिरलेले सफरचंदाचे तुकडे
 • १०-१२ हिरवी द्राक्षे
 • १-१ मोसंबी व संत्रे
 • १ वाटी घट्ट गोड दही
 • २ मोठे चमचे ऑरेंज स्क्वॅश किंवा स्ट्रॉबेरी क्रश
 • पाव चमचा लिंबाचा रस
 • १ चमचा मीठ

‘फलमाधूरी’ची पाककृती

 • संत्रे व मोसंबी सोलून पाकळ्या सुट्या कराव्या.
 • द्राक्षे धुवावी, बियांची द्राक्षे असल्यास अर्धी चिरून बिया काढाव्या.
 • द्राक्षांची साल काही वेळा जाड असते त्यामुळे ती सोलावी.
 • सफरचंद चिरून त्यावर लिंबाचा रस घालावा म्हणजे तुकडे काळे पडणार नाहीत.
 • आता ही सर्व फळे एका बाऊलमध्ये एकत्र करून त्यामध्ये गोड दही, ऑरेंज स्क्वॅश किंवा स्ट्रॉबेरी क्रश, चवीनुसार मीठ घालून ढवळा व थंड थंड सर्व्ह करा.
स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.