दशमी पुरी - पाककृती

दशमी पुरी, पाककला - [Dashami Puri, Recipe] दुधात मळलेली ‘दशमी पूरी’ ही प्रवासात नेता येण्यासाठी योग्य आहेच शिवाय घरात पाहुण्यांना पूरीचा नवीन प्रकार म्हणून खायला देवून वाहवा मिळवता येईल आणि न्याहारी व मधल्या वेळेत करुन खाता येईल.
दशमी पुरी - पाककला | Dashami Puri - Recipe

खास पाहुणचारासाठी तसेच बरेच दिवस टिकणारी दशमी पुरी

‘दशमी पुरी’साठी लागणारा जिन्नस

 • १ किलो गव्हाचे पीठ
 • १/२ लीटर दूध
 • १/४ चमचे मीठ
 • १०० ग्रॅम साखर
 • ५० ग्रॅम खसखस
 • १०० ग्रॅम तूप किंवा तेल मोहनासाठी
 • तळण्यासाठी तेल

‘दशमी पुरी’ची पाककृती

 • दुधात साखर आणि थोडेसे पाणी मिळवून इतके गरम करवे की साखर विरघळावी आणि दूध फक्त कोमट रहावे.
 • आता पिठात खसखस, मीठ आणि मोहन चांगल्या तर्‍हेने मिळवावे आणि दुधाच्या मिश्रणाने खुप कडक मळावे.
 • तयार पीठ ओल्या कापडात अर्धा तास झाकावे.
 • पुरी बनवते वेळी परत चांगले मळावे ज्यामुळे पूरी नरम होईल.
 • पीठाची छोटी छोटी गोळी बनवून पुरी लाटावी.
 • गरम तुपात किंवा तेलात तळावी.
दशमी पुर्‍या प्रवासात जाण्यासाठी उपयोगी आहेतच शिवाय घरी येणार्‍या पाहुण्यांना वाढण्यासाठीही मनमोहक आहेत.

प्रवासात जात असाल तर थोड्या वेळ थंड करण्यासाठी ठेवून केळीच्या पानात पॅक कराव्या. बरेच दिवस पुर्‍या मुलायम आणि स्वादिष्ट राहून प्रवासात आपल्याला साथ देत राहतील.
स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.