खरवस - पाककृती

खरवस, पाककला - [Kharvas, Recipe] प्रोटीन व कॅलरीयुक्त खरवस हा पोष्टीक पदार्थ उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात खाणे चांगले असते.
खरवस - पाककृती | Kharvas - Recipe

थंडीच्या दिवसात प्रोटीन व कॅलरीयुक्त आरोग्यदायी पदार्थ म्हणजे खरवस

‘खरवस’साठी लागणारा जिन्नस
 • १ लिटर चीक (खरवसाचे दूध)
 • १ कप दूध
 • ३०० ग्रॅम गूळ
 • १०० ग्रॅम साखर
 • वेलची किंवा जायफळाची पूड

‘खरवस’ची पाककृती
 • चीकाचे दूध घेऊन त्यात बारीक केलेला गूळ व साखर चांगले ढवळावे
 • त्यात १ कपभर दूध घालून गाळावे
 • मग त्यात वेलचीची पूड किंवा अर्धे जायफळ किसून घालावे
 • कुकरच्या २ भांड्यात सारखे घालावे
 • १५-२० मिनिटे शिटी न लावता वाफेवर ठेवावे
 • थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात
खरवस उष्ण असल्यामुळे केवळ थंडीच्या दिवसात खाण्यास उत्तम.


स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.

जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.