श्रीखंड - पाककृती

श्रीखंड, पाककला - [Shrikhand, Recipe] गोड पदार्थ म्हणून सणासुदीला ‘श्रीखंड’ आवर्जून खाल्ले जाते.
श्रीखंड- पाककला | Shrikhand - Recipe

लहान मुलांचा आवडीचा तसेच सणासुदीचा गोड पदार्थ ‘श्रीखंड’

‘श्रीखंड’साठी लागणारा जिन्नस

 • १ किलो मलईचा चक्का
 • १ किलो साखर
 • ८ - १० वेलदोड्याची पूड
 • अर्धी वाटी जायफळाची पूड
 • थोडे केशर व केशरी रंग (हवे असल्यास)
 • १ कप दूध
 • थोडी चारोळी
 • बदाम - पिस्त्याचे काप
 • १ चमचा मीठ

‘श्रीखंड’ची पाककृती

 • चक्का व साखर थोडे थोडे एकत्र करून पुरणयंत्राला २ नंबरची जाळी लावून त्यातून काढा.
 • नंतर त्यात दूध घालून मिश्रण सारखे करा.
 • फार घट्ट वाटल्यास आणखी थोडे दुध घाला.
 • नंतर त्यात मीठ, वेलदोड्याची व जायफळाची पूड, केशराची पूड व थोडा केशरी रंग घालून सारखे करा.
 • श्रीखंड तयार झाले की, शोभिवंत भांड्यात काढून वरून बदाम-पिस्त्याचे काप व चारोळी पसरा.
 • फ्रीजमध्ये ठेवून जेवताना थंडगार श्रीखंड गरमागरम पुरीसोबत सर्व्ह करा.
पांढरे श्रीखंड हवे असल्यास केशरी रंग घालू नये. पार्टीसाठी गुलाबी, पिवळे श्रीखंड करता येईल.

या श्रीखंडात आंब्याचा रस घातल्यास आम्रखंडही तयार होईल.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.