सांबाराचे गोळे - पाककृती
सांबाराचे गोळे, पाककला - [Sambarache Gole, Recipe] रोजच्या जेवणातील आमटीला खमंग आणि चटपटीत चव देणारे सांबाराचे गोळे.
रोजच्या जेवणातील आमटी जर खमंग आणि चटपटीत करायची असेल तर त्यात सांबराचे गोळे नक्की घालून बघा, आमटीला किती मस्त चव येते.
‘सांबाराचे गोळे’साठी लागणारा जिन्नस
- चणाडाळ
- तिखट
- मीठ
- हिंग
- हळद
- जिऱ्याची पूड
- धण्याची पूड
‘सांबाराचे गोळे’ची पाककृती
- रात्री चण्याची डाळ भिजत घालावी.
- चांगली भिजल्यावर सकाळी जाडसर वाटावी.
- त्यात तिखट, मीठ, हिंग, हळद, जिऱ्याची पूड, धण्याची पूड घालून लहान बोराएवढे गोळे करावेत.
- हे गोळे प्लॅस्टिकवर/ताटावर घालून खडखडीत होईपर्यंत वाळू द्यावेत.
हे वाळवलेले ‘सांबाराचे गोळे’ आपण आपल्या आवडीच्या आमटी मध्ये घालू शकतो, ज्याने आमटीला खमंग आणि चटपटीत चव येते.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.