स्वीस रोल पुडिंग - पाककृती
स्वीस रोल पुडिंग, पाककला - [Swiss Roll Pudding, Recipe] लहान मुलांना आवडीचा आणि वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमात जेवणानंतरचा गोड पदार्थ ‘स्वीस रोल पुडिंग’ जेवणाची शान वाढवेल.
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा गोड पदार्थ ‘स्वीस रोल पुडिंग’.
‘स्वीस रोल’साठी लागणारा जिन्नस
- ३ अंडी
- ७५ ग्रॅम पिठीसाखर
- ७५ ग्रॅम मैदा
- १/२ टी. स्पू. बेकींग पावडर
- ३ टे. स्पू. स्ट्रॉबेरी जाम (पातळ केलेला)
- १ टे. स्पू. पांढरे लोणी
‘पुडिंग’साठी लागणारा जिन्नस
- २ वाटी कापलेले मिक्स फ्रुट (संत्री, अननस, द्राक्षे)
- १ पाकीट स्ट्रॉबेरी जेली
- २०० ग्रॅम फ्रेश क्रिम
- ४ टे. स्पू. साखर
‘स्वीस रोल पुडिंग’ची पाककृती
- साखर, अंडी एकत्र करुन खूप फेटावे.
- मैदा, बेकिंग पावडर एकत्र करुन चाळून घ्यावे.
- अंडीच्या मिश्रणात पातळ केलेले लोणी व मैदा घालून मिक्स करावे.
- केकच्या चौकोनी टिनमध्ये तूप लावून मिश्रण घालावे.
- १८० डि. वर २५ - ३० मिनिटे ओव्हनमध्ये बेक करावे.
- ओव्हनमधून काढून थंड करावे.
- त्यावर जेल पसरवून पेपरच्या सहाय्याने रोल करावा.
- गोल स्लाईसेस कापावे.
- पुडिंग मोल्डमध्ये स्लाईसेस लावून घ्यावे.
- पुडिंगसाठी जेली गरम पाण्यात विरघळून फ्रिजमध्ये सेट करावी.
- साखर व क्रिम फेसुन त्यात कापलेले फ्रुट्स, तयार जेलीचे काप एकत्र करुन पुडिंग मोल्डमध्ये स्लाईसेसवर पसरावी.
- २५ - ३० मिनिटं फ्रिजमध्ये ठेवावे.
- सर्व्ह करण्यापूर्वी डिशमध्ये काढून त्यावर जेली पिसेसने डेकोरेट करावे.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.