नाचणीचा उपमा - पाककृती

नाचणीचा उपमा, पाककला - [Nachanicha Upma, Recipe] अस्सल महाराष्ट्रीय, पौष्टिक आणि पचायला हलका असणारा नाचणीचा उपमा न्याहारीसाठी उत्तम पर्याय आहे.
नाचणीचा उपमा - पाककला | Nachanicha Upma - Recipe

खास करून उन्हाळ्यात न्याहारीसाठी पौष्टिक, पचायला हलका असा नाचणीचा उपमा


नाचणीचा उपमा - अस्सल महाराष्ट्रीय, पौष्टिक आणि पचायला हलका असणारा नाचणीचा उपमा न्याहारीसाठी उत्तम पर्याय आहे.नाचणीचा उपमा करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • १ वाटी नाचणी
 • १ टी.स्पून मेथी
 • १ टे.स्पून मोडाचे मूग
 • १ टे.स्पून टोमॅटो
 • १ टे.स्पून गाजर किसून
 • २ बारीक चिरुन मिरच्या
 • हिंग
 • मोहरी
 • आलं - लसूण पेस्ट
 • तेल
 • जीरे
 • हळद
 • कढीपत्ता
 • कोथिंबीर
 • लिंबूरस

नाचणीचा उपमा करण्याची पाककृती


 • नाचणीला भिजवून मोड आणून वाफवावे.
 • थोड्या तेलात मोहरी, जीरे घालून फोडणी घालावी.
 • यात मिरच्या, कढीपत्ता घालावा. आलं-लसूण पेस्ट घालवी.
 • गाजर किसून, टोमॅटो चिरुन, मूग, मेथ्या सर्व घालून पाच मिनीटे शिजवावे.
 • २-३ वाफा आल्या की नाचणी घालावी.;
 • मीठ व लिंबूरस घालून ढवळून परत २ मिनीटे गॅसवर ठेवावे.
 • गरम गरम उपम्यावर कोथिंबीर व वाटल्यास शेव घालून खायला द्यावे.

स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.