कोहिनूर चटणी - पाककृती

कोहिनूर चटणी, पाककला - [Kohinoor Chutney, Recipe] आवडीची फळे आणि वेगळी चव असलेली ‘कोहिनूर चटणी’ चवीला बदल म्हणून सर्वांनाच आवडेल.
कोहिनूर चटणी - पाककला | Kohinoor Chutney - Recipe

वेगवेगळ्या फळांनी युक्त अशी ‘कोहिनूर चटणी’.

‘कोहिनूर चटणी’साठी लागणारा जिन्नस

 • २० लिंबु
 • १॥ कि. साखर
 • १/२ चमच गुलाबपाणी
 • २०० ग्रा. टिन अननस रस व तुकडे किंवा १/२ अननस २०० ग्रा. साखरेत शिजवलेले
 • १ चिक्कु
 • १ सफरचंद
 • २ बब्बुगोशे किंवा नरम नाशपाती
 • ५० ग्रा. चेरी
 • एका डाळिंबाचे दाणे
 • ४ केळी
 • आंबा
 • १ आलुबुखार
 • २० बदाम
 • ५ अक्रोड
 • बारीक कापलेले ५० ग्रा. द्राक्षे
 • थोडेसे मगज

‘कोहिनूर चटणी’ची पाककृती

 • एक ग्लास पाणी जाड बुडाच्या पातेल्यात उकळण्यासाठी ठेवा.
 • त्यात साखर टाकुन हलवावे व १० मिनिट शिजवावे.
 • एका लिंबाचा रस टाकुन वरून फेस काढुन गॅसवरून उतरून घ्यावे.
 • पाहिजे तर गाळुन घ्यावे, नाहीतर थंड झाल्यावर एक एक लिंबाचा रस काढुन मिळवित जावा.
 • नंतर त्यात गुलाबपाणी मिळवावे.
 • जेव्हा सर्व लिंबाचा रस मिसळेल तेव्हा अननसाचा रस टाकुन हलवावे. 
 • चासणीचे मिश्रण पारदर्शक दिसेल तेव्हा रंग पिवळा होईल.
 • आता सर्व फळे बारीक कापुन डाळिंब दाण्यासहीत त्यात मिळवावे.
 • अननसाचे तुकडे आसपास सजविण्यासाठी ठेवू शकता.
 • शेवटी सुके मेवे टाकुन बरणीत बंद करून ठेवावे.
 • जर अधिक वेळ म्हणजे एक वर्षापर्यंत ठेवायचे असल्यास त्यात पोटेशियम मेटा बाय सल्फाइट चा अर्धा चमचा मिळवून ठेवावे.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.