फालूदा - पाककृती
फालूदा, पाककला - [Falooda, Recipe] गरमीमध्ये थंडावा आणण्यासाठी आणि मुलांचा आवडता थंडगार पदार्थ ‘फालूदा’ आता घरच्या घरी वेगवेगळा प्लेवर घालून बनवू शकता.
खास लहान मुलांसाठी उन्हाळ्यात थंडगार ‘फालूदा’
‘फालूदा’साठी लागणारा जिन्नस
- २ कप व्हॅनिला आईस्क्रिम
- १ कप फालूदा शेव
- गुलाबाचे सरबत
- अर्धा कप ताजे क्रीम
- १ लिटर दूध
- २ छोटे चमचे गुलाब एसेंस
- १/२ कप बदाम व पिस्ते
- चार चमचे साखर
‘फालूदा’ची पाककृती
- दूधात साखर टाकून आटवा.
- थंड झाल्यावर त्यात गुलाब एसेंस टाकून जमवण्यास फ्रिजमध्ये ठेवा.
- वाढतांना एका आईस्क्रिम ग्लासात गुलाब सरबत टाकून मग फालूदा शेवया टाका.
- त्यावर जमवलेले दूध टाका.
- मग व्हॅनिला आईस्क्रिम घालून व क्रीम टाकून त्यावर बदाम, पिस्त्याने सजवा.
फालुद्यामध्ये तुम्हाला आवडणारा आईस्क्रीम फ्लेवर, इसेंस घालून त्याची चव वाढवू शकता.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.