साबुदाण्याची लापशी - पाककृती

साबुदाण्याची लापशी, पाककला - [Sabudanyach Lapsi, Recipe] पचायला हलकी आणि मऊसर अशी ही ‘साबुदाण्याची लापशी’ न्याहारी म्हणुन उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर आजारी व्यक्तिंना तसेच वयस्कर व्यक्तिंना हलकी पुलकी साबुदाण्याची लापसी खायला नक्कीच आवडेल.

साबुदाण्याची लापशी - पाककला | Sabudanyach Lapsi - Recipe

पचायला हलकी आणि मऊसर ‘साबुदाण्याची लापशी’

साबुदाण्याच्या लापशीसाठी लागणारा जिन्नस

  • १ टेबलस्पून साबुदाणा
  • १ कप दूध
  • २ चमचे साखर

साबुदाण्याच्या लापशीची पाककृती

  • साबुदाणा थोडा वेळ धुऊन ठेवावा.
  • नंतर १/२ कप पाण्यात शिजवून घ्यावा.
  • वाटल्यास थोडेसे आणखी पाणी घालावे.
  • नंतर त्यात दूध व साखर घालून थोडा वेळ शिजवावे.
  • मग खाली उतरवून गार किंवा गरम आवडीप्रमाणे लापशी द्यावी.
आयत्या वेळी त्यात चिमूटभर मीठ टाकल्यास ही लापशी खूप छान लागते.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.