चीझ व भाजीचा पराठा - पाककृती

चीझ व भाजीचा पराठा, पाककला - [Cheese And Vegetable Paratha, Recipe] चीझ आणि वेगवेगळ्या भाज्या किंवा तुम्हाला आवडतील त्या भाज्या घालून चटपटीत असा चीझ व भाजीचा पराठा डब्यात किंवा न्याहारी, मधल्या वेळेत करता येईल.
चीझ व भाजीचा पराठा - पाककला | Cheese And Vegetable Paratha - Recipe

चीझ आणि वेगवेगळ्या भाज्यांनी चटपटीत असलेला ‘चीझ व भाजीचा पराठा’

‘चीझ व भाजीचा पराठा’साठी लागणारा जिन्नस

 • १ कप मैदा
 • १ कप कणीक
 • ६ टे. स्पून डालडाचे मोहन
 • १/४ कप किसलेले चीझ
 • १ लहानसा फ्लॉवर
 • १ गाजर
 • १ वाटी मटारचे दाणे
 • १ कांदा
 • ३/४ हिरव्या मिरच्या
 • लहानसा आल्याचा तुकडा
 • २/४ लसूण पाकळ्या
 • थोडा पुदिना
 • कोथिंबीर

‘चीझ व भाजीचा पराठा’ची पाककृती

 • सर्व भाज्या किसुन घ्या. मटारचे दाणे व भाज्या थोडे मीठ घातलेल्या पाण्यात वाफवून घ्याव्यात.
 • नंतर सर्व मिश्रण घोटून घ्यावे. पाणी अजिबात राहू देऊ नये.
 • नंतर त्यात मीठ, मिरच्या, आले, लसूण, पुदिना वगैरे घालून मिश्रण ढवळावे, चीझही घालावे.
 • नंतर मिश्रण थंड होऊ द्यावे.
 • पिठात थोडे मीठ व मोहन घालून पोळ्यांच्या कणकेसारखी कणीक भिजवावी.
 • मध्यम आकाराच्या दोन पोळ्या करुन मध्यभागी सारण पसरुन कडा कातण्याने कापून परोठे शेकावे. बाजूने तूप सोडावे.
 • उलटताना फार जपून व बेताने उलटावेत.
गरमागरम पराठे सॉस किंवा चटणीसोबत खाण्यास द्यावे.

चीझ व भाजीचे पराठे चवीला फारच लुसलुसीत व चटपटीत लागतात.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.