Loading ...

ओल्या काजूची भाजी - पाककृती

ओल्या काजूची भाजी, पाककला - [Olya Kajuchi Bhaji, Recipe] मराठमोळी महाराष्ट्रीयन खास करुन कोकणात केली जाणारी ‘ओल्या काजूची भाजी’ ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं असेल ना!

ओल्या काजूची भाजी - पाककला | Olya Kajuchi Bhaji - Recipe

कोकणची खासियत असलेली ओल्या काजूची भाजी

‘ओल्या काजूची भाजी’साठी लागणारा जिन्नस

  • पाव किलो सोललेले ओले काजूगर
  • २ कांदे
  • २ बटाटे
  • १ टोमॅटो
  • अर्धा ओला नारळ किसून
  • लसुण
  • आले
  • गरम मसाला पावडर
  • तिखट
  • हळद
  • मीठ
  • कोथिंबीर
  • तेल

‘ओल्या काजूची भाजी’ची पाककृती

  • काजूगर रात्री कोमट पाण्यात भिजत घालून सकाळी सोलावेत.
  • बटाट्याची साले काढून तुकडे करावेत.
  • प्रथम कढईत तेल टाकून जीरे, मोहरी, कांदा, लसुण व टोमॅटो टाकून चांगले परतवून घेणे.
  • चांगले शिजल्यावर त्यात सोललेले काजू व बटाट्याचे तुकडे टाकून त्यात आवडीनुसार तिखट, हळद, मीठ व पाणी घालून शिजु द्यावेत.
  • नंतर भाजलेल्या कांदा - खोबर्‍याचे वाटप करुन ते त्यामध्ये घालावे व पुन्हा चांगले शिजवून घ्यावेत.
  • चांगल्या उकळ्या आणून काजू व बटाटा शिजवून घ्यावेत.
  • काजू व बटाटा शिजला की त्यामध्ये गरम मसाला पावडर घालावी व एक उकळी आणून गॅस बंद करावा.
  • तयार भाजीवरती बारीक चिरलेली कोथिंबीर पसरावी.



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची