Loading ...

भाज्यांचे लोणचे - पाककृती

भाज्यांचे लोणचे, पाककला - [Vegetables Pickle, Recipe] नेहमीच्या लोणच्यापेक्षा निराळे असे चटकदार आणि जेवणाला स्वाद आणणारे ‘भाज्यांचे लोणचे’ नक्की बनवून पहा.

भाज्यांचे लोणचे- पाककला | Vegetables Pickle - Recipe

चटकदार आणि जेवणाचा स्वाद वाढवणारे ‘भाज्यांचे लोणचे’

‘भाज्यांचे लोणचे’साठी लागणारा जिन्नस

  • १ वाटी फ्लॉवरचे तुरे
  • १ वाटी सलगमचे साल काढून तुकडे
  • १ वाटी गाजर तुकडे
  • १ कांदा
  • २ टेबल स्पून आले - लसूण बारीक चिरून
  • तिखट
  • मीठ
  • गरम मसाला चवीनुसार
  • २ टी स्पून मोहरी पूड
  • २ टेबल स्पून व्हिनेगर
  • १/२ वाटी साखर किंवा गूळ
  • २ टेबल स्पून मोहरी तेल

‘भाज्यांचे लोणचे’ची पाककृती

  • भाज्या उकळत्या पाण्यात दोन मिनिटे शिजवून चाळणीवर ओताव्यात.
  • कापडावर पसरून पूर्ण कोरड्या कराव्यात.
  • कांदा किसावा.
  • गूळ व व्हिनेगर एकत्र करून मंद गॅसवर मधाप्रमाणे होईपर्यंत उकळावे. गार करावे.
  • तेल तापवून कांद्याचा किस, लसूण, आले परतावे.
  • लालसर झाले की उतरवून त्यात मीठ, मोहरी पूड, तिखट व गरम मसाला एकत्र करावा.
  • बरणीत भरून पुन्हा थोडं तेल घालावं. हे लोणचे उन्हात ठेवूनही करतात.
  • कांदे ऐच्छिक आहे.

आपल्याला मोहरीऐवजी शेंगदाणा तेल व लोणच्याचा मसाला वापरून हे लोणचे करता येते. लिंबूरस घालून तात्पुरते लोणचे छान लागते.



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची