चण्याच्या डाळीची आमटी - पाककृती
चण्याच्या डाळीची आमटी, पाककला - [Chanyachya Dalichi Aamti, Recipe] रोजरोजच्या आमटीपेक्षा वेगळी व चविष्ट चण्याच्या डाळीची आमटी’ जेवणाला वेगळीच चव आणते.
चविष्ट व जेवणाला चव आणणारी ‘चण्याच्या डाळीची आमटी’
‘चण्याच्या डाळीची आमटी’साठी लागणारा जिन्नस
- २०० ग्रॅम चण्याची डाळ
- १ कापलेला कांदा
- २ पाकळी लसूण
- १ तुकडा कापलेले आले
- २ कापलेले टोमॅटो
- १/२ चमचे जीरे
- १/२ चमचे गरम मसाला
- १/२ चमचे आमचूर
- १ मोठा चमचा तेल
- मीठ
‘चण्याच्या डाळीची आमटी’ची पाककृती
- चण्याच्या डाळीला कमी पाण्यात उकळुन त्यातील पाणी काढून वेगळे करावे.
- तेल गरम करून जीरे व कांद्यास फ्राय करून लसूण व आले टाकुन २ मिनीट भाजावे.
- गरम मसाला, आमचूर व मीठ टाकावे.
- नंतर चण्याची डाळ टाकावी आणि ३ - ४ मिनीट शिजवावे.
- टोमॅटो टाकून वेगळे केलेले पाणी टाकावे व २ मिनीटे शिजविल्यानंतर वरून कोथिंबीर पेरावी व तयार चण्याच्या डाळीची आमटी उतरून ठेवावी.
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.