उपवासाला चालणारी रताळ्याची कचोरी
‘रताळ्याची कचोरी’च्या सारणासाठीचे जिन्नस
- १ मूठ चिरलेली कोथिंबीर
- १ वाटी खवलेले खोबरे
- ४-५ हिरव्या मिरच्या
- ५० ग्रॅम बेदाणे
- चवीनुसार मीठ
- साखर
‘रताळ्याची कचोरी’च्या कव्हरसाठीचे जिन्नस
- २५० ग्रॅम रताळी
- १ मोठा बटाटा
- थोडेसे मीठ
‘रताळ्याची कचोरी’ची पाककृती
- रताळी व बटाटे उकडून घ्यावेत व सोलून हाताने कुस्करून पुरणयंत्रातून काढून घ्यावेत. त्यात थोडे मीठ घालावे.
- १/२ चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. नंतर गॅसवरुन खाली उतरवून त्यात खवलेले खोबरे, चिरलेली कोथिंबीर, बेदाणे, चवीनुसार मीठ व थोडीशी साखर घालुन सारण करावे.
- रताळी व बटाटेची पारी करून त्यात थोडे सारण घालून कचोर्या करून ठेवाव्यात.
- नंतर आयत्या वेळी वरीच्या तांदळाच्या पिठात घोळवून तुपात/तेलात तळाव्यात.
लहान मुलांसाठी तसेच उपवास असलेल्या मंडळींसाठी एक वेगळा पदार्थ.
जीवनशैली / पाककला
- [col]
- महाराष्ट्रीय पदार्थ
न्याहारीचे पदार्थ
आमट्या,सार,कढी
कोशिंबीर,सलाड,रायते
पोळी भाकरी
भाज्या - उपवासाचे पदार्थ
पौष्टिक पदार्थ
पथ्यकर पदार्थ
मसाले
चटण्या
लोणची - मधल्या वेळचे पदार्थ
सरबते व शीतपेये
पुडिंग
आईस्क्रीम
बेकिंग
गोड पदार्थ - भाताचे प्रकार
मांसाहारी पदार्थ
वाळवणाचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ
दिवाळी फराळ
पाककृतींचे व्हिडीओ