Loading ...

उपवासाचा बटाटा वडा - पाककृती

उपवासाचा बटाटा वडा, पाककला - [Upavasacha Batata Vada, Recipe] उपवास असलेल्या मंडळींसाठी खास चटपटीत असलेला ‘उपवासाचा बटाटा वडा’ नक्की करून पहा.

उपवासाचा बटाटा वडा - पाककला | Upavasacha Batata Vada - Recipe
+

उपवासासाठी खास चटपटीत उपवासाचा बटाटा वडा

‘उपवासाचा बटाटा वडा’च्या सारणासाठीचे जिन्नस

  • १ किलो उकडलेले बटाटे
  • १ कच्चा बटाटा किंवा १ रताळे किसलेले
  • आले
  • हिरव्या मिरच्या(उपवासाला चालत असल्यास)
  • बारीक कापलेली कोथिंबीर
  • चवीप्रमाणे मीठ
  • साखर
  • एक चमचा लिंबू रस
  • दाण्याचा कुट
  • खवलेला ओला नारळ

‘उपवासाचा बटाटा वडा’च्या कव्हरसाठीचे जिन्नस

  • राजगिरा पीठ
  • शिंगाडा पीठ
  • साबूदाणा पीठ (नसले तरी चालेल)

‘उपवासाचा बटाटा वडा’ची पाककृती

  • प्रथम हिरव्या मिरच्या, आले व थोडेसे जीरे घालून वाटून घ्या. बटाटे गरम असतानाच सोलून घ्या व बारीक करा.
  • नंतर ते गार झाल्यावरच त्यात चवीप्रमाणे आल्यासह मिरचीचा ठेचा, दाण्याचा कुट, खवलेला ओला नारळ घाला.
  • नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ व एक चमचा साखर घाला वर लिंबाचा रस टाका व सर्व मिश्रण हाताने एकजीव करा.
  • एकजीव झालेल्या सारणाचे तळहाताला थोडे पाणी लावून चपटे वडे थापून घ्या.
  • आता एका भांड्यात सर्व पीठे एकत्र करुन त्यात पाणी घालून सरबरीत करा.
  • त्यात थोडेसे मीठ, तिखट व किसलेला कच्चा बटाटा किंवा रताळे घाला.
  • गॅसवर कढईत तेल घालून तापवा.
  • तेल गरम होताच त्यातून एक चमचा तेल काढून सरबरीत केलेल्या पिठात टाकून ढवळा.
  • नंतर वडे तयार पिठात घोळवून तेलात तळून काढा व गरमागरम वडे खोबर्‍याच्या चटणी सोबत सर्व्ह करा.

टीप: तापलेल्या तेलात चिमुटभर मीठ टाका म्हणजे वडे तेलकट होत नाहीत.




स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची