इंद्रधनुषी सॅलेड - पाककृती

इंद्रधनुषी सॅलेड, पाककला - [Indradhanushi Salad, Recipe] सर्व पौष्टिकतेने परिपुर्ण असलेले हे ‘इंद्रधनुषी सॅलेड’ आपल्या रोजच्या जेवणात नाविन्यता आणते.
इंद्रधनुषी सॅलेड - पाककला | Indradhanushi Salad - Recipe

पौष्टिकतेने परिपुर्ण असे इंद्रधनुषी सॅलेड

‘इंद्रधनुषी सॅलेड’साठी लागणारा जिन्नस

 • अंकुरित मूग
 • ४ काकडी
 • २ बीट
 • ४ गाजर
 • ४ मुळा
 • २ टॉमेटो
 • २ लिंबू
 • ७-६ सॅलेडची पाने
 • ४ हिरवी मिरची
 • १ लहान चमचा मीठ
 • १/२ लहान चमचा काळी मिरी पावडर
 • १ लहान चमचा चाट मसाला

‘इंद्रधनुषी सॅलेड’ची पाककृती

 • २ बीट, २ मुळे, २ गाजर किसून घ्या.
 • काकडी, लिंबू व टॉमेटो गोल चिरुन घ्या.
 • आता उरलेले २ मुळे व २ गाजर लांबट चिरा.
 • एका डिशमध्ये सॅलेडची पाने सजवा.
 • मधोमध किसलेला मुळा, गाजर व बीट ठेवा.
 • चारी बाजुला चिरलेला मुळा, गाजर, काकडी, लिंबू, टॉमेटो व हिरवी मिरची लावून सजवा.
 • वरून मीठ, मिरची व चाट मसाला टाकून सॅलेड तयार.

टीप: चेरी आणि टोमॅटो ने सजवल्यास आवडीने हे इंद्रधनुषी सॅलेड खाता येईल.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.