मुळ्याचा पराठा - पाककृती

मुळ्याचा पराठा, पाककला - [Mulyacha Paratha, Recipe] खासकरुन मुळ्याची भाजी करताना वास येतो त्यामुळे कोणी खायला तयार नसते. त्यामुळे तो वास घालवून सर्वांना आवडेल असा चटपटीत ‘मुळ्याचा पराठा’ बनवून खाता येईल.
मुळ्याचा पराठा - पाककला | Mulyacha Paratha - Recipe

मधल्या वेळेच्या भुकेसाठी तसेच झटपट होणारा चटपटीत ‘मुळ्याचा पराठा’

‘मुळ्याचा पराठा’साठी लागणारा जिन्नस

 • २ ताजे किसलेले मुळे
 • १/२ चमचे लाल मिरची
 • १/२ चमचे वाटलेले अनारदाने
 • १ कांदा बारीक कापलेला
 • १ कापलेली हिरवी मिरची
 • १ जुडी कापलेली कोथिंबीर
 • १ कप तूप तळणासाठी
 • २५० ग्रॅम गव्हाचे पीठ
 • १ चमचा तूप पीठात मळण्यासाठी
 • मीठ चवीनुसार

‘मुळ्याचा पराठा’ची पाककृती

 • पीठात तुप व मीठ मिळवावे.
 • नंतर किसलेले मुळे, कांदा, हिरवी व लाल मिरची व कोथिंबीर व मीठ मिसळून आवश्यकतेनुसार पाणी टाकुन घट्ट मळावे.
 • मळलेल्या पिठाचे बरोबर सहा गोळे करून गोल पराठे लाटावे.
 • दोन्ही बाजुस तूप लावून शेकवावे.
दही, हिरवी चटणी किंवा लोणच्या बरोबर गरम गरम वाढावे.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.