पंचमेल सब्जी - पाककृती

पंचमेल सब्जी, पाककला - [Panchmel Sabzi, Recipe] पाच प्रकारच्या भाज्या एकत्र करुन केलेली राजस्थानची प्रसिद्ध ‘पंचमेल सब्जी’ पोळी किंवा भाताबरोबर छान लागते.
पंचमेल सब्जी - पाककला | Panchmel Sabzi - Recipe

पाच प्रकारच्या भाज्या एकत्र करुन केलेली पंचमेल सब्जी

‘पंचमेल सब्जी’साठी लागणारा जिन्नस

 • २५० ग्रॅम बटाटा
 • ४ वांगी
 • २०० ग्रॅम दूधी
 • १५० ग्रॅम वाटाणे
 • कोथिंबीर
 • ३ - ४ हिरव्या मिरच्या
 • थोडासा गरम मसाला
 • धणे पावडर
 • लाल तिखट
 • काळी मिरी
 • मेथी दाणा
 • जीरे
 • कांद्याच्या बीया
 • बडीशेप
 • १०० ग्रॅम दूध
 • लाल तिखट पावडर
 • तूप फोडणीसाठी

‘पंचमेल सब्जी’ची पाककृती

 • तूप कढईत टाकून फोडणी द्या. मसाले परतून झाल्यावर कोथिंबीर व मिरची चिरून टाका.
 • थोडा वेळ परतून सर्व भाज्या चिरून टाका. मीठ व बाकी मसाले टाकून परता.
 • भाजी थोडी शिजल्यावर दूध टाका. आता कढई झाकून भाजी मंद गॅसवर शिजवा.
 • भाजी शिजल्यावर गरम मसाला टाकून परता व गरम गरम वाढा.स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.