Loading ...

कोणासाठी जळतोय आपण? - मराठी कविता (आकाश पवार)

कोणासाठी जळतोय आपण? (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी आकाश पवार यांची कोणासाठी जळतोय आपण? ही मराठी कविता.

कोणासाठी जळतोय आपण? - मराठी कविता (आकाश पवार)

नेते बोलतात, जनता जळते, त्यांच्या शब्दांनी दंगली पेटते... कोणासाठी जळतोय आपण?

कोणासाठी जळतोय आपण?

आकाश पवार (शिराढोण, कळंब, धाराशिव)

नेते बोलतात, जनता जळते, त्यांच्या शब्दांनी दंगली पेटते. कोण कबर काढतो, कोण ठेवतो, जनतेला मात्र दुःखच मिळतो. मस्साजोगचा ताजा श्वास, न्यायाची झाली तमा उदास. नेते फक्त नाटक खेळत, सत्याच्या दिव्याला वारं लावतात. हातात मशाल, ओठात वचन, रक्ताने भरले सांडले अंगण. धर्माच्या नावाने, जातीच्या वादाने, माणुसकीची झाली होळी या भडाग्नीने. त्यांनी ठरवलं, आम्ही मरायचं, त्यांनी पेटवलं, आम्ही झुंजायचं. कोणी कधी विचारलंच नाही, या लढायांनी काय मिळायचं? कोणासाठी पेटतो आपण? कुणासाठी रक्त सांडतो आपण? नेते जिंकतात, जनता मरते, सत्तेच्या लढाईत नाती हरते. थांबा, विचार करा रे जनहो, स्वतःच्या आयुष्याचा हिशोब मांडू. भडकावणाऱ्या शब्दांना नकार देऊ, आपल्या गावाला शांततेचा वर देऊ. 🔥 ✊ सावध रहा जनता ✊ 🔥

आकाश पवार यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची