Loading ...

अजरामर चित्रपट अमर भूपाळी

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रवाह पिक्चरवर मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ उलगडणारा अजरामर चित्रपट अमर भूपाळी.

अजरामर चित्रपट अमर भूपाळी

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रवाह पिक्चरवर पाहा अजरामर चित्रपट अमर भूपाळी

उलगडणार मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ...

मराठी चित्रपटांच्या सुवर्ण इतिहासात अजरामर ठरलेला चित्रपट म्हणजे अमर भूपाळी. १९५१ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट लवकरच ७५ वर्ष पूर्ण करणार आहे. व्ही शांताराम यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला हा चित्रपट अभिनेत्री संध्या, ललिता पवार आणि पंडीतराव नगरकर अश्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने नटलेला आहे.

अमर भूपाळी सिनेमातील लता मंगेशकर, आशा भोसले आणि पंडीतराव नगरकर यांच्या आवाजातील घनश्याम सुंदरा, लटपट लटपट आणि सांगा मुकुंद कुणी हा पाहिला... ही गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. ७५ वर्ष उलटून गेली तरी आजही ही गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. या चित्रपटाला संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. तर शाहीर होनाजी बाळा यांनी ही गाणी लिहीली होती.

मराठी चित्रपटाचा हा सुवर्णकाळ पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी सिनेरसिकांना मिळणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी चित्रपटांच्या इतिहासात अजरामर ठरलेला अमर भूपाळी सिनेमा प्रवाह पिक्चरवर पहाता येणार आहे.

मराठी सिनेमांचं व्यापक रुप आपण अनुभवत असताना पुन्हा एकदा ब्लॅक ॲण्ड व्हाईट चित्रपटाच्या काळात जाण्याची संधी प्रवाह पिक्चर वाहिनी घेऊन आली आहे. गुढीपाडव्याच्या सणाचा जल्लोष आणि सहकुटुंब दुपारी १ वाजता अमर भुपाळी चित्रपट पहाण्याचा आनंद लुटायलाच हवा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची