Loading ...

खेड्यातील आनंद - मराठी कविता (वा. भा. पाठक)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वा. भा. पाठक (वामन भार्गव पाठक) यांची खेड्यातील आनंद ही लोकप्रिय मराठी कविता.

खेड्यातील आनंद - मराठी कविता (वा. भा. पाठक)

फुटे क्षितिजी तांबडे जो न थोडे


खेड्यातील आनंद - मराठी कविता (वा. भा. पाठक)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वा. भा. पाठक (वामन भार्गव पाठक) यांची खेड्यातील आनंद ही लोकप्रिय मराठी कविता.



फुटे क्षितिजी तांबडे जो न थोडे
तोच जागे होतसे सर्व खेडे
तरुण आखाड्याकडे धाव घेती
वृद्ध भूपाळ्या प्रभुस आळवीती

उठुनि गृहिणी लगबग अंगणात
सडासमार्जन करित राहतात
आणि वृंदावन कुणी परसदारि
नम्रभावे साष्टांग नमस्कारी

सान-थोरांना समय पहाटेचा
असा वाटे उत्साह-उमेदीचा
मीहि मिळुनी त्यांच्यात गमे जावे
आणि सौख्यी त्या भागिदार व्हावे

सूर्य मध्यान्हावरी चढत आहे
पूर्ण शांती खेड्यात नांदताहे
गाव-शीवेच्या वृक्ष-साउलीस
बसे कोणी पांथस्थ विसाव्यास

निघे पाण्यावर गुरां-वासरांचा
थवा, येई वर लोट तो धुळीचा
नाद कानावर पडे घुंगरांचा
सूर मिसळे त्यामधे पावरीचा

मोट सुटली, मोकळे बैल झाले
गडी सारे एकत्र जमुनी आले
बसुन पाटाच्या वाहत्या कडेला
सोडु आता लागले न्याहरीला

सान-थोरांना समय शांततेचा
असा वाटे हा गोड विसाव्याचा
मीहि वाटे त्यांच्यात मिळुन जावे
आणि सौख्यी त्या भागिदार व्हावे

ऊन पसरे कोवळे सोनीयाचे
कळस पिवळे शोभती देवळांचे
थवा आकाशी उडे पाखरांचा
मार्ग धरुनी आपुल्या कोटरांचा

दावणीशी वासरे ओढ घ्याया
आणि आता लागली हंबराया
सांज झालेली, सुटे मंद वात
घरांमधुनी लागेल सांजवात

समय सर्वांना हाच विसाव्याचा
एकमेकांना सुखे भेटण्याचा
मीहि वाटे त्यांच्यात मिळुन जावे
आणि सौख्यी त्या भागिदार व्हावे

- वा. भा. पाठक (वामन भार्गव पाठक)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची