Loading ...

रक्ताची ओढ (मराठी कविता)

रक्ताची ओढ (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी योगेश कर्डिले यांची रक्ताची ओढ ही मराठी कविता.

रक्ताची ओढ (मराठी कविता)

माझ्याच पाठीत सूरा भोसकून येणारे रक्त पाहून तुला आनंद होतोय...


रक्ताची ओढ (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ‘योगेश कर्डिले’ यांची ‘रक्ताची ओढ’ ही मराठी कविता.



माझ्याच पाठीत सूरा भोसकून येणारे रक्त पाहून तुला आनंद होतोय
कळतंय ते मला
बाप म्हणतोय बेटा एक चांगला मुलगा बन
लोकांसमोर दुःख प्रकट करू नकोस
पण इथे तर तू मात्र जवळचाच त्यामुळे त्रास जरा जास्तच होतोय
पण तरीही मी तोंड दाबून गप्प बसायचा आटोकाट प्रयत्न करतोय
तुला अजूनच चेव चढतोय
तू परत एकदा सुरा भोकसतो
माझे रक्त वाहत जाते
सहनशक्तीच्या पलीकडे मग माझा आवाज फुटतो
तू म्हणतोस पहा कसा ओरडतोय हा?
मी तर याच्या पाठीला आधार देतोय
सगळे तऱ्हे (नाते) वाईक तुला साथ देताय
कोणी कुंपणावरून तर कोणी मैदानात उतरून
बाप म्हणतोस शांत बस लोक काय म्हणतील!
पण मी ओरडत जातो बापाचा चेहरा मग धूसर होत जातो
ते लोक स्पष्ट होतात
मुखवट्याआडचे त्यांचे हसू आणि त्यातील भेसूर दात प्रकट होतात
मी सर्वशक्तीनिशी तुला ढकलतो आणि त्या सगळ्या तऱ्हे (नाते) वाईकांपासून लांब जातो
पण तोपर्यंत या घरावर, जमिनीवर असतात आपल्या रक्ताळलेल्या आठवणी
कधीही न धुतल्या जाणाऱ्या
सगळे टाळ्या पिटतात आणि एक वेडा खेळातून बाद झाला म्हणून करमणूक करून घरी जातात
तू मात्र तिथेच ते रक्त तुझ्या जिभेने चाटूनपुसून सर्व साफ करीत हसतोय
साफ झालेले मैदान तुझे एकट्याचे न ओरडता पचविलेला हा एक खून आपल्याच रक्ताचा



रक्ताची ओढ (मराठी कविता) संबंधी महत्त्वाचे दुवे:


- योगेश कर्डिले

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची