Loading ...

इंच इंच लढवू - मराठी कविता (वसंत बापट)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वसंत बापट यांची इंच इंच लढवू ही लोकप्रिय मराठी कविता.

इंच इंच लढवू - मराठी कविता (वसंत बापट)

उतुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू


इंच इंच लढवू - मराठी कविता (वसंत बापट)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वसंत बापट यांची इंच इंच लढवू ही लोकप्रिय मराठी कविता.



उतुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
अभिमान धरु, बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू

परक्यांचा येता हल्ला
प्रत्येक घर बने किल्ला
हे कोटि कोटि भुजदंड
होतील इथे ध्वजदंड
छातीची करुनी ढाल, लाल या संगिनीस भिडवू

बलवंत उभा हिमवंत
करी हैवानांचा अंत
हा धवलगिरी, हा नंगा
हा त्रिशूळ कांचनगंगा
जरि झुंड पुंडशत्रूंची आली, खिंड खिंड अडवू

जरि हजार अमुच्या जाती
संकटामधें विरघळती
परचक्र येतसे जेव्हा
चौदांची एकच जिव्हा
मग पक्ष, पंथ जरि लक्ष आमुचे, सागरात बुडवू

राष्ट्राचा दृढ निर्धार
करु प्राणपणे प्रतिकार
ह्या नसानसातिल रक्त
जाळील आसुरी तख्त
आम्ही न कुणाचे दास, नवा इतिहास पुन्हा घडवू

अन्याय घडो शेजारी
की दुनियेच्या बाजारी
धावून तिथेही जाऊ
स्वातंत्र्य-मंत्र हा गाऊ
स्वातंत्र्य, बंधुता, समता यांचा घोष सदा घुमवू

- वसंत बापट

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची