Loading ...

सैनिकाप्रत - मराठी कविता (वसंत बापट)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वसंत बापट यांची सैनिकाप्रत ही लोकप्रिय मराठी कविता.

सैनिकाप्रत - मराठी कविता (वसंत बापट)

सदैव सैनिका, पुढेच जायचे, न मागुती तुवा, कधी फिरायचे


सैनिकाप्रत - मराठी कविता (वसंत बापट)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वसंत बापट यांची सैनिकाप्रत ही लोकप्रिय मराठी कविता.



सदैव सैनिका
पुढेच जायचे
न मागुती तुवा
कधी फिरायचे

सदा तुझ्यापुढे
उभी असे निशा
सदैव काजळी
दिसायच्या दिशा
मधून मेघ हे
नभास ग्रासती
मधेच या विजा
भयाण हासती
दहा दिशांतुनी
तुफान व्हायचे

प्रलोभने तुला
न लोभ दाविती
न मोह-बंधने
पदांस बांधिती
विरोध क्रोध वा
तुला न थांबवी
न मोह भासतो
गजांतवैभवी
न दैन्यही तुझे
कधी सरायचे

वसंत वा शरद
तुला न ती क्षिती
नभात सूर्य वा
असो निशापती!
विदीर्ण वस्त्र हो
मलीन पावले
तरी न पाय हे
कधी विसावले!
न लोचना तुवा
सुखें मिटायचे

नभात सैनिका
प्रभात येउ दे
खागांसवे जगा
सुखांत गाउ दे
फुलाफुलांवरी
सुवर्ण शोभु दे
जगास शांतता
सुहास्य लाभु दे
न पाय तोवरी
तुझे ठरायचे

- वसंत बापट

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची