Loading ...
/* Dont copy */

फुंकर - मराठी कविता (वसंत बापट)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वसंत बापट यांची फुंकर ही लोकप्रिय मराठी कविता.

फुंकर - मराठी कविता (वसंत बापट)

बसा म्हणालीस, मी बसलो, हसलीस म्हणून हसलो


फुंकर - मराठी कविता (वसंत बापट)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वसंत बापट यांची फुंकर ही लोकप्रिय मराठी कविता.



बसा म्हणालीस - मी बसलो
हसलीस म्हणून हसलो
बस्स - इतकेच
बाकी मन नव्हते थाऱ्यावर

दारावरचा पडदा दडपीत
तू लगबग निघून गेलीस
माजघरात
माझ्यासोबत ठेवून
तुझ्या सुस्त संसाराच्या निशाण्या

या जाळीच्या पडद्यात
कशाला कोरले आहेस
हे हृदय - उलटे - उत्तान?
काचेच्या कपाटात
कशाला ठेवल्या आहेस
भुश्श्याच्या राघूमैना?
उडताहेत लाकडी फळांवर
कचकड्यांची फुलपाखरे
भिंतीवर रविवर्म्याची पौष्टिक चित्रे हारीने

काळ्या मखमलीवर
पतीच्या नावाचा रेखीव कशिदा
त्यातला एक टाका जरी चुकली असतीस
तरी मी धन्य झालो असतो.
तू विचारलेस, काय घेणार?
काय पण साधा प्रश्न
काय घेणार?
देणार आहेस का ते सारे - पूर्वीचे?
मला हवे आहेत
चिंचेचे आकडे - ते
ते अघाशी ओठ, ती कुजबुज, त्या शपथा!
दे झालं कसलंही साखरपाणी

तुझं आणि तुझ्या पतीचं हे छायाचित्र
छान आहे.
तुझ्यावरची सारी साय
या फुगीर गालांवर ओसंडते आहे.
बळकट बाहू, रुंद खांदे,
डोळ्यांत कर्तेपणाची चमक
छान आहे.
राग येतो तो तुझा
या चित्रात तू अशी दिसतेस
जसे काही कधी झालेच नाही!

मी तुला बोलणार होतो
छद्मीपणाने
निदान एक वाक्य, एक जहरी बाण
ते मला जमले नाही, आणि
तू तर नुसती हसत होतीस
आता एकच सांग,
उंबर्‍यावर तुझ्या डोळ्यांत पाणी आले
इतकी का तुला सुपारी लागली?
पण नकोच सांगूस,
तेवढीच माझ्या मनावर
एक फुंकर

- वसंत बापट

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची