शब्दांनो बदला आता - मराठी कविता

शब्दांनो बदला आता, मराठी कविता - [Shabdano Badala Aata, Marathi Kavita] शब्दांनो सांभाळा तुमचे अर्थ चेहेरे बदला थोडे.

शब्दांनो सांभाळा तुमचे अर्थ चेहेरे बदला थोडे

शब्दांनो,
सांभाळा तुमचे अर्थ
चेहेरे बदला थोडे
खुप झाले आता
गुजरात, लिबिया, इराक
अन्‌
अफगाणिस्तानसारखे
तुमचे अर्थ
चेहेरे नसाल तर
भाषा तरी बदला तुमची
कसाब, जुन्दाल, ओबामा
ओसामा
अशा अर्थाचे शब्द
कायमचे घालवा तुमच्यातून
कुणी विवेकानंद, रविंद्र,
जिगर, मजाझ, गालिब
असे कितीतरी शब्द
तुम्ही त्यांना घातलेय वाळीत
कधीपासून
गोंजारा
अन्‌
आपलेसे करा त्यांना
मगच लाभेल
मोक्ष तुम्हा-आम्हाला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.