Loading ...

माझा पाऊस - मराठी कविता

माझा पाऊस, मराठी कविता - [Majha Paus, Marathi Kavita] पाऊस सगळ्यांचाच असतो, सगळ्यांनी तो भोगलेलाही असतो.

पाऊस सगळ्यांचाच असतो, सगळ्यांनी तो भोगलेलाही असतो

पाऊस सगळ्यांचाच असतो
सगळ्यांनी तो भोगलेलाही असतो
मलाही पाऊस माहीत आहे
मीही पाऊस कधीतरी
भोगलेला आहे
झेललेलाही आहे
माझ्यासाठी
पाऊस म्हणजे
फक्त एक आठवण
लहानपणी माझा बाप
जेव्हा मारायचा
माझ्या आईला
योगायोगाने नाही
पण
पाऊस बाहेर
पडत रहायचा
माझ्या आईचे
पाणावलेले डोळे
मला फक्त दिसायचे
तिच्या डोळ्यातील
पाऊस
तोच पाऊस
मला आठवतो
तोच पाऊस मला
माहित आहे
माझ्यासाठी
पाऊस म्हणजे
दु:ख, यातना, क्लेष
अश्रू, हंबरडा
आणि मूक विलाप
माझ्या आईचा
पाऊस म्हणजे
माझ्यासाठी नेहमीच
पाण्याचा अर्थहीन
थेंबांचा
आणि
माझ्या गेलेल्या
आईच्या आठवणींचा

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची