माझं दैवत घरात - मराठी कविता

माझं दैवत घरात, मराठी कविता - [Majha Daivat Gharat, Marathi Kavita] माझं दैवत उभं, माझ्याच घरात.

माझं दैवत उभं, माझ्याच घरात

माझं दैवत उभं
माझ्याच घरात
आयुष्यभरासाठी
‘आशीर्वाद’ देण्यास

माझ्या मना
काहीच कळेना
विसर मनाला
लागलो वारीला

वारी-वारी करून
झालो मी बारीक
खर्चुनी घरचं धन
लागली मनास सल

सुखाच्या मी शोधात
कपाळी बुक्का लावत
माझं दैवत घरात
मी निघालो वारीत

देहू-आळंदी झाले
पंढरी झाली-काशीलाही गेलो
मिसळलो मी वारीत
गुलाल खोबरे उधळत

उशिराने कळुनी
चुकले मनास
‘वैभवाचं मंदिर’
त्यावर कळस

‘तुळशीसम’ प्रसन्न
सगळीकडं सहभाग
सुखदुखात सोबत
‘मना हिरवं रोपटं’

आली दाटुनी
नयनी आसवे
मन माझे
पोरके झाले

होतं घरीच दैवत
मी निघत वारीत
मी निघत वारीत
माझं दैवत घरात

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.