Loading ...

दीपविसर्जन - मराठी कविता (माधवानुज)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी माधवानुज (डॉ. काशिनाथ हरी मोडक) यांची दीपविसर्जन ही लोकप्रिय मराठी कविता.

दीपविसर्जन - मराठी कविता (माधवानुज)

करी आरती घेउनी आर्यबाला


दीपविसर्जन - मराठी कविता (माधवानुज)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी माधवानुज (डॉ. काशिनाथ हरी मोडक) यांची दीपविसर्जन ही लोकप्रिय मराठी कविता.



करी आरती घेउनी आर्यबाला
त्वरे पातल्या नर्मदेच्या तटाला
करूनी तयांनी सरित्पूजनाला
प्रवाही दिली सोडुनी दीपमाला

अहा काय शोभा वदू त्या क्षणाची
तृषा शांत झाली मदीयेक्षणांची
तदा अस्तगामी जरी अंशुमाली
मना वाटले यामिनी काय झाली

सरित्पात्र ते स्वच्छ तैसे विशाल
तदा भासले की दुजे अंतराल
तती त्यावरी शोभली दीपिकांची
उदेली जणो पंक्ति की तारकांची

जशी अंतरिक्षी फिरे चंद्रकोर
प्रवाही करी रम्य नौकाविहार
नभी स्वैर संचारती मेघखंड
जली खेळती वीचि तैशा उदंड

अशी दिव्य शोभा पहाता पहाता
मनी शांत झालो, लया जाय चिंता
झणी सूचली कल्पना एक चित्ता
असे सर्व सृष्टीस जी मूलभूता

दिले सोडूनी दीप जे बालिकांनी
दिला सारिखा वेग सर्वा तयांनी
तयांची स्थिती तत्क्षणी भिन्न झाली
वरी दृष्य कोणी, कुणी जाय खाली

कुणी गुंतुनी राहिले भोव‍र्‍यात
जलौघासवे जाय कोणी वहात
तयातील काही तटा अन्य गेले
पुढे जाउनी अल्प मागेचि आले

जसे दीप तैसे असंख्यात जीव
प्रभू निर्मितो, थोर ज्याचा प्रभाव
तया सोडुनी देत काल-प्रवाही
वहाती तदौघासवे सर्व देही

कुणी रंक होई, कुणी होय राजा
दुजा देखणा हो, तिजा हीनतेजा
कुणी मूर्ख होई, कुणी हो शहाणा
कुणी धैर्यशाली, तसा भ्याड जाणा

“तसे का करावे?” “असे मी करीन”
वृथा वल्गना मानवाच्या अजाण
स्थितीचा असे किंकर प्राणिमात्र
स्थिती त्या करी पात्र किंवा अपात्र

जरी राहिले नर्मदातीर दूर
जरी आज बाला न दृष्टीसमोर
स्मरोनी तरी दीपसर्गप्रसंग
झणी हर्षयोगें भरे अंतरंग

- माधवानुज (डॉ. काशिनाथ हरी मोडक)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची