Loading ...
/* Dont copy */

जाईची फुले - मराठी कविता (माधवानुज)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी माधवानुज (डॉ. काशिनाथ हरी मोडक) यांची जाईची फुले ही लोकप्रिय मराठी कविता.

जाईची फुले - मराठी कविता (माधवानुज)

स्वागत केले माझे, सन्मित्रा, त्वा फुलास देऊन


जाईची फुले - मराठी कविता (माधवानुज)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी माधवानुज (डॉ. काशिनाथ हरी मोडक) यांची जाईची फुले ही लोकप्रिय मराठी कविता.



स्वागत केले माझे, सन्मित्रा, त्वा फुलास देऊन
झाला मोद मनाला प्रेमे त्यांचा सुगंध सेवून

जी ‘दाराची’ फुले त्वा अपुल्या मज आणुनी दिली सुमने
होता पुंज गुणांचा नव्हती ती सत्य जाईची सुमने

कारण त्या पुष्पांनी कथिले भाषा स्वकीय बोलून
“वरिवरि हुंगुनि” आम्हा वेड्या देऊ नकोस फेकून

जे गुण असती साधे हितकर अंगात आमुच्या चार
घे शिकुनी त्या योगे स्वर्गाचेही खुले तुला द्वार

जैसा परिमल अमुचा टाकी सज्जन मनास मोहून
तव कीर्तीचा परिमल जग मोहू दशदिशी दणाणून

आहे जगात अमुचे निर्मल अतिशुभ्र सर्वदा रूप
तैसे तुझे असावे वर्तन त्या नच शिवो कधी पाप

आम्ही कोमल तैसे हृदय असावे तुझे सदा साच
कोमेजावे त्याने दीनाचा पाहुनी जगी जाच

रूप मनोहर अमुचे दिसते परि ते नसे रहायाचे
जग हे असार सारे जे दिसते ते अखेर जायाचे

इतुके बोलुनि थकली, सुकली, मुकली स्वकीय तेजाते
जाईची दिव्य फुले असली फेकील कोण हो हाते

ती धन्य रम्य कुसुमे, मित्रा तू धन्य सत्य त्याहून
मी धन्य धन्य का की माझ्या ती पावली करी निधन

- माधवानुज (डॉ. काशिनाथ हरी मोडक)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची