Loading ...

भारतमाता - मराठी कविता (शांता शेळके)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री शांता शेळके यांची भारतमाता ही लोकप्रिय मराठी कविता.

भारतमाता - मराठी कविता (शांता शेळके)

प्रियतम अमुची भारतमाता, आम्ही सारी तिची मुले


भारतमाता - मराठी कविता (शांता शेळके)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री शांता शेळके यांची भारतमाता ही लोकप्रिय मराठी कविता.



प्रियतम अमुची भारतमाता
आम्ही सारी तिची मुले,
रंग वेगळे, गंध वेगळे
तरी येथली सर्व फुले!

प्रिय आम्हाला येथील माती
प्रिय हे पाणी झुळझुळते,
प्रियकर ही डुलणारी शेते
प्रिय हे वारे सळसळते

प्रियतम अमुचा धवल हिमालय
बघे भिडाया जो गगना,
प्रियतम अमुचे सह्यविंध्य हे
प्रियतम या गंगा यमुना

मानव सारे समान असती
शिकवण ही जगतास दिली!
या मातेची मुले सद्गुणी
सर्व जगाला प्रिय झाली!

प्रियतम अमुची भारतमाता
वंदन आम्ही तिला करू
या मातेची मुले लाडकी
सदा तिचा ध्वज उंच धरू!

- शांता शेळके

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची