Loading ...

आला आश्‍विन आश्‍विन - मराठी कविता (विजया संगवई)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री विजया संगवई (विजया व्यंकटेश संगवई) यांची आला आश्‍विन आश्‍विन ही लोकप्रिय मराठी कविता.

आला आश्‍विन आश्‍विन - मराठी कविता (विजया संगवई)

आला आश्‍विन आश्‍विन


आला आश्‍विन आश्‍विन - मराठी कविता (विजया संगवई)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री विजया संगवई (विजया व्यंकटेश संगवई) यांची आला आश्‍विन आश्‍विन ही लोकप्रिय मराठी कविता.



आला आश्‍विन आश्‍विन

मऊ धुकं पांघरून
साज दवाचे लेवून
उन्हं केशरी पिऊन

आला आश्‍विन आश्‍विन

तरारली रानं वनं
बहरली उपवनं
रंग-गंधांत न्हाऊन

आला आश्‍विन आश्‍विन

तृप्त झुळुझुळु गाणं
गंधगार रुणझुण
मुक्‍त किलबिल तान

आला आश्‍विन आश्‍विन

शेतामधी झुले सोनं मन आले भरून दारी झेंडूंची तोरणं

आला आश्‍विन आश्‍विन

स्निग्ध दुधाळ चांदिणं
अमृताचे ढाळी कण
नभ कोंदे नक्षत्रानं

आला आश्‍विन आश्‍विन

जाती सीमा उल्लंघून
लुटा समतेचं सोनं
गात मानव्याचं गाणं

- विजया संगवई (विजया व्यंकटेश संगवई)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची