Loading ...
/* Dont copy */

जयोस्तुते - मराठी कविता (वि. दा. सावरकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वि. दा. सावरकर (विनायक दामोदर सावरकर) यांची जयोस्तुते ही लोकप्रिय मराठी कविता.

जयोस्तुते - मराठी कविता (वि. दा. सावरकर)

जयोस्तुते श्रीमहन्मंगले! शिवास्पदे शुभदे


जयोस्तुते - मराठी कविता (वि. दा. सावरकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वि. दा. सावरकर (विनायक दामोदर सावरकर) यांची जयोस्तुते ही लोकप्रिय मराठी कविता.



जयोस्तुते श्रीमहन्मंगले! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती! त्वामहं यशोयुता वंदे

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची
स्वतंत्रते भगवती! श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तूची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती! चांदणी चमचम लखलखसी
वंदे त्वामहं यशोयुता वंदे

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती! तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची
स्वतंत्रते भगवती! अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वामहं यशोयुता वंदे

मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती! योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महंमधुर ते ते
स्वतंत्रते भगवती! सर्व तव सहचारी होते
वंदे त्वामहं यशोयुता वंदे

हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते
तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण,
भरतभूमिला दृढालिंगना कधी देशील वरदे
वंदे त्वामहं यशोयुता वंदे

हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रीडा तिथे करण्याचा कां तुला वीट आला
होय आरसा अप्सरांचा सरसे करण्याला
सुधाधवल जान्हवीस्त्रोत्र तो का गे त्वा त्याजिला
स्वतंत्रते, या सुवर्णभूमित कमती काय तुला?
कोहिनुरचे पुष्प रोज घे ताजे वेणीला

- वि. दा. सावरकर (विनायक दामोदर सावरकर)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची