Loading ...
/* Dont copy */

चुकलेले कोकरू - मराठी कविता (वि. दा. सावरकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वि. दा. सावरकर (विनायक दामोदर सावरकर) यांची चुकलेले कोकरू ही लोकप्रिय मराठी कविता.

चुकलेले कोकरू - मराठी कविता (वि. दा. सावरकर)

का भटकसि येथे बोले


चुकलेले कोकरू - मराठी कविता (वि. दा. सावरकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वि. दा. सावरकर (विनायक दामोदर सावरकर) यांची चुकलेले कोकरू ही लोकप्रिय मराठी कविता.



का भटकसि येथे बोले l का नेत्र जाहले ओले
कोणी का तुला दुखवीले l सांग रे!

धनि तुझा क्रूर की भारी l का माता रागे भरली
का तुझ्यापासुनी चुकली l सांग रे!

हा हाय कोकरू बचडे l किति बे बे करुनी अरडे
उचलोनि घेतले कडे l गोजिरे!

मग थोपटुनी म्या हाते l आणिले गृहाते त्याते
तो नवल मंडळीना ते l जाहले.

गोजिरे कोकरू काळे l नउ दहा दिनांचे सगळे
मउमऊ केश ते कुरळे l शोभले.

लाडक्या का असा भीसी l मी तत्पर तव सेवेसी
कोवळी मेथि ना खासी l का बरे?

बघ येथे तुझियासाठी l आणिली दुधाची वाटी
परि थेंब असा ना चाटी l का बरे?

हळु दूध थोडके प्याले l मग त्वरे तोंड फिरवीले
कोकरु बावरुन गेले l साजिरे!

लटकून छातिशी निजले l तासही भराभर गेले
विश्व हे मुदित मग केले l रविकरे

घेउनी परत त्या हस्ती l कुरवाळित वरचेवरती
कालच्या ठिकाणावरती l सोडिले.

तो माता त्याची होती l शोधीत दूर शिशुसाठी
दगडांचे तरुचे पाठी l हाय रे!

हंबरडे ऐकू आले l आनंदसिंधु ऊसळले
स्तनि शरासारखे घुसले l किति त्वरे!

- वि. दा. सावरकर (विनायक दामोदर सावरकर)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची