Loading ...

विमान फिरते अधांतरी - मराठी कविता (गोपीनाथ)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी गोपीनाथ (गोपीनाथ गणेश तळवलकर) यांची विमान फिरते अधांतरी ही लोकप्रिय मराठी कविता.

विमान फिरते अधांतरी - मराठी कविता (गोपीनाथ)

किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान फिरते अधांतरी


विमान फिरते अधांतरी - मराठी कविता (गोपीनाथ)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी गोपीनाथ (गोपीनाथ गणेश तळवलकर) यांची विमान फिरते अधांतरी ही लोकप्रिय मराठी कविता.



किती मौज दिसे ही पहा तरी
हे विमान फिरते अधांतरी

खोल नदीतुन कापित पाणी
मत्स्य धावतो चहुबाजूंनी
घारच अथवा फिरते गगनी
हुबेहुब हे त्याच परी

रविकररंजित मेघांमधुनी
स्वच्छ चांदण्यामधे पोहुनी
घुमघुम नादे दिशा घुमवुनी
प्रवास करि हे जगावरी

परंतु केव्हा पाऊस गारा
प्रांत वेढुनी टाकिती सारा
त्यातूनही हे जाई भरारा
नवल नव्हे का खरोखरी?

पहा जाऊनी विमानातूनी
दिसेल शोभा अपूर्व वरुनी
डोंगर, राने, ओहळ, तटिनी
आणि कुठे सागरलहरी

ग्रहनक्षत्रे आकाशातील
विमान बघुनी मनात म्हणतील
भेटाया अपणा पृथ्वीतील
येति माणसे कुणीतरी

नको सूर्यचंद्रावर जाया
नको जगाची सफर कराया
नेई विमाना, मज त्या ठाया
जेथं माय मम वास करी

- गोपीनाथ (गोपीनाथ गणेश तळवलकर)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची