Loading ...

भिल्लाचा पोर - मराठी कविता (गोपीनाथ)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी गोपीनाथ (गोपीनाथ गणेश तळवलकर) यांची भिल्लाचा पोर ही लोकप्रिय मराठी कविता.

भिल्लाचा पोर - मराठी कविता (गोपीनाथ)

उंच उंच डोंगर भवती, चढले नील नभात


भिल्लाचा पोर - मराठी कविता (गोपीनाथ)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी गोपीनाथ (गोपीनाथ गणेश तळवलकर) यांची भिल्लाचा पोर ही लोकप्रिय मराठी कविता.



उंच उंच डोंगर भवती I चढले नील नभात
भिरभिर वारा व्यापुनिया I टाकी सारा प्रांत

तरुवेलींनी फुललेल्या I त्या खोऱ्यात सुरेख
झुळझुळ वाहे निर्झरिणी I स्फटिकावाणी एक

तोच कुणी चपळाईने I डोंगर वेधुन थोर
करवंदे विकण्यासाठी I ये भिल्लाचा पोर

शाळिग्रामासम काळा I देह कसा घोटीव
तेजदार नागावाणी I दिसे कोवळा जीव

स्वच्छ गोल डोळ्यात नसे I भीतीचा लवलेश
साधा भोळा भाव मुखी I आणि दिसे आवेश

ओठ चिमुकले विलग जरा I होती मधुन मधून
शुभ्र हिरकण्यासम दिसती I दंत किती शोभून

एक करी घेऊनि परशू I दुसऱ्या हाती द्रोण
“करवंदे घ्या करवंदे” I सांगतसे गर्जून

असेल याची पर्णकुटी I जवळच रम्य निवांत
मातापितरांसह तेथे I रहात हा सौख्यांत

स्वातंत्र्याचा खराखुरा I शाहिर आहे हाच
नागरवस्तीचा नाही I या जीवाला जाच

पक्ष्यांची ऐकत गाणी I देत तयाना ताल
हिंडावे रानोरानी I आनंदात खुशाल

घाट सोडुनी कधीच ये I गाडी निघुनी दूर
परि न हले डोळ्यांपुढुनी I तो भिल्लाचा पोर

- गोपीनाथ (गोपीनाथ गणेश तळवलकर)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची