Loading ...

शाळेचा रस्ता - मराठी कविता (गो. गं. लिमये)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी गो. गं. लिमये (गोपाळ गंगाधर लिमये) यांची शाळेचा रस्ता ही लोकप्रिय मराठी कविता.

शाळेचा रस्ता - मराठी कविता (गो. गं. लिमये)

शाळेस रोज जाताना, मज विघ्ने येती नाना


शाळेचा रस्ता - मराठी कविता (गो. गं. लिमये)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी गो. गं. लिमये (गोपाळ गंगाधर लिमये) यांची शाळेचा रस्ता ही लोकप्रिय मराठी कविता.



शाळेस रोज जाताना l मज विघ्ने येती नाना!

किति पक्षी गाती गाणी
झाडावरि म्हणती बसुनी
ये मुला, खेळु या मिळुनी
परि उशीर टाळायाला l मी निघे तडक शाळेला!

टोळ कसे गवतावरती
आनंदें टुण टुण उडती
खेळाया बोलावीती
परि उशीर टाळायाला l मी निघे तडक शाळेला!

गारुडी वाजवुनि पुंगी
बोलावी झणि मजलागी
बहु जमती जन त्या जागी
परि उशीर टाळायाला l मी निघे तडक शाळेला!

बाजूस खेळणीवाला
वाखाणुनि अपुल्या माला
वेधितसे नकळत बाळा
परि उशीर टाळायाला l मी निघे तडक शाळेला!

वाटेतिल झाडे वेली
हालविती पाने अपुली
बोलाविति मजला जवळी
परि उशीर टाळायाला l मी निघे तडक शाळेला!

- गो. गं. लिमये (गोपाळ गंगाधर लिमये)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची