Loading ...
/* Dont copy */

घास भरवताना - मराठी कविता (बा. भ. बोरकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर) यांची घास भरवताना ही लोकप्रिय मराठी कविता.

घास भरवताना - मराठी कविता (बा. भ. बोरकर)

दीपका, मांडिले तुला, सोनियाचे ताट


घास भरवताना - मराठी कविता (बा. भ. बोरकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर) यांची घास भरवताना ही लोकप्रिय मराठी कविता.



‘दीपका’! मांडिले तुला, सोनियाचे ताट
घडविला, जडविला चंदनाचा पाट

घरदार प्रकाशाने भरी काठोकाठ
दारी आलेल्याची करू सोपी पायवाट

घातली ताईने तुला रंगांची रांगोळी
पित्याने रेखिल्या गोड भविष्याच्या ओळी

घाशिली समई मीही केली तेलवात
दह्यात हा कालविला जिरेसाळ भात

गा रे राघू, गा गे मैने, बाळाच्या या ओळी
मुखी तुमच्याही घालू दुधातली पोळी

कुतु-काऊ, चिऊ-माऊ या रे सारे या रे
सांडलेली शिते गोड, उचलुनी घ्या रे

गुणी माझा बाळ कसा मटामटा जेवी
आयुष्याने थोर करी माये! कुलदेवी

- बा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर)

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची