Loading ...

चढवू गगनी निशाण - मराठी कविता (बा. भ. बोरकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर) यांची चढवू गगनी निशाण ही लोकप्रिय मराठी कविता.

चढवू गगनी निशाण - मराठी कविता (बा. भ. बोरकर)

चढवू गगनी निशाण, अमुचे चढवू गगनी निशाण


चढवू गगनी निशाण - मराठी कविता (बा. भ. बोरकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर) यांची चढवू गगनी निशाण ही लोकप्रिय मराठी कविता.



चढवू गगनी निशाण, अमुचे चढवू गगनी निशाण
कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्थान

निशाण अमुचे मनःक्रांतीचे, समतेचे अन् विश्वशांतिचे
स्वस्तिचिन्ह हे युगायुगांचे ऋषिमुख-तेज महान

मुठ न सोडू जरि तुटला कर, गाऊ फासहि आवळला जर
ठेवू निर्भय ताठ मान ही झाले जरि शिरकाण

साहू शस्त्रास्त्रांचा पाऊस, आम्ही प्रल्हादाचे वारस
सत्य विदारक आणू भूवर दुभंगून पाषाण

विराटशक्ती आम्ही वामन, वाण आमुचे दलितोद्धारण
नमवू बळीचा किरीट उद्धृत ठेवुनि पादत्राण

हिमालयासम अमुचा नेता, अजातशत्रू आत्मविजेता
नामे त्याच्या मृत्युंजय हे चढवू वरनि निशाण

- बा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची