Loading ...
/* Dont copy */

माझ्या गोव्याच्या भूमीत - मराठी कविता (बा. भ. बोरकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर) यांची माझ्या गोव्याच्या भूमीत ही लोकप्रिय मराठी कविता.

माझ्या गोव्याच्या भूमीत - मराठी कविता (बा. भ. बोरकर)

माझ्या गोव्याच्या भूमीत, गड्या नारळ मधाचे


माझ्या गोव्याच्या भूमीत - मराठी कविता (बा. भ. बोरकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर) यांची माझ्या गोव्याच्या भूमीत ही लोकप्रिय मराठी कविता.



माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या नारळ मधाचे
कड्या-कपारीमधोनी
घट फ़ुटती दुधाचे

माझ्या गोव्याच्या भूमीत
आंब्या फणसांची रास
फुली फळांचे पाझर
कळी फुलांचे सुवास

माझ्या गोव्याच्या भूमीत
वनश्रीची कारागिरी
पाना - फ़ुलांची कुसर
पशु - पक्ष्यांच्या किनारी

माझ्या गोव्याच्या भूमीत
उन्हाळ्यात खारा वारा
पावसात दारापुढे
सोन्या - चांदीच्या रे धारा

माझ्या गोव्याच्या भूमीत
येते चांदणे माहेरा
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा

माझ्या गोव्याच्या भूमीत
चाफा पानावीण फुले
भोळाभाबडा शालीन
भाव शब्दांवीण बोले

माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या साळीचा रे भात
वाढी आईच्या मायेने
सोनकेवड्याचा हात

माझ्या गोव्याच्या भूमीत
सागरात खेळे चांदी
आतिथ्याची, अगत्याची
साऱ्या षडरसांची नांदी

माझ्या गोव्याच्या भूमीत
जिव्या सुपारीचा विडा
अग्निदिव्यांतुन हसे
पाचपोवळ्यांचा चुडा

माझ्या गोव्याच्या भूमीत
काळे काजळाचे डोळे
त्यात सावित्रीची माया
जन्मजन्मांतरी जळे

माझ्या गोव्याच्या भूमीत
लाल माती, निळे पाणी
खोल आरक्त धावात
शुद्ध वेदनांची गाणी

माझ्या गोव्याच्या भूमीत
खड्गा जडावाची मूठ
वीर - शृंगाराच्या भाळी
साजे वैराग्याची तीट

माझ्या गोव्याच्या भूमीत
उंच धूड देवळांचे
ताजमहाल भक्तीच्या
अश्रूंतल्या चांदण्यांचे

माझ्या गोव्याच्या भूमीत
तृणी सुमनांचे गेंद
सिद्ध कुणब्यांच्या तोंडी
शुद्ध सौंदर्याचे वेद

माझ्या गोव्याच्या भूमीत
सुखाहुनी गोड व्यथा
रामायणाहुनी थोर
मूक उर्मिलेची कथा

माझ्या गोव्याच्या भूमीत
सारा माझा जीव जडे
पुरा माझ्या कवनांचा
गंध तेथे उलगडे

- बा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर)

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची