Loading ...
/* Dont copy */

बोला कुणाकुणा हवे - मराठी कविता (बा. भ. बोरकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर) यांची बोला कुणाकुणा हवे ही लोकप्रिय मराठी कविता.

बोला कुणाकुणा हवे - मराठी कविता (बा. भ. बोरकर)

बोला कुणाकुणा हवे फुलपाखरांचे थवे


बोला कुणाकुणा हवे - मराठी कविता (बा. भ. बोरकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर) यांची बोला कुणाकुणा हवे ही लोकप्रिय मराठी कविता.



बोला कुणाकुणा हवे फुलपाखरांचे थवे
जादूगार श्रावणाच्या कर्णकुंडलींचे दिवे

निळे, जांभळे, तांबडे जर्द पिवळे, हिरवे
काळे, पांढरे, राखेरी, भुरे, पोपटी, पारवे
कोणी उन्हेरी, चंदेरी, कोणी अंजिरी, शेंदरी
मोरपिसांपरी कोणी वर्ख ल्यालेले भर्जरी
कुणी मखमली, मल्मली, कुणी वर्गंदी, वायली
किनखापी मुलायम, कुणी शीतल सायली
कुणा अंगी वेलबुट्टी, चित्रचातुरी गोमटी
इंद्रधनूचेही वर्ण होती पाहून हिंपुटी

वर्णलाघवाचे थवे जाती घेत हेलकावे
कधी थांबून पुसती फुलापानांची आसवे
कधी पिकलेल्या साळी, कधी साळकांची तळी
कधी लालगुंज रस्ता जाती लंघून मंडळी
त्यांच्या लावण्याने दुणा येथे श्रावणाचा हर्ष
अशा मोसमी गोव्यात खरेच या एक वर्ष
पण धरायचा त्यांना फक्त करावा बहाणा
सुखे बघत रहावा सप्तरंगांचा तराणा

- बा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर)

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची