Loading ...

स्वर्ग असा - मराठी कविता (ग. ल. ठोकळ)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी ग. ल. ठोकळ (गजानन लक्ष्मण ठोकळ) यांची स्वर्ग असा ही लोकप्रिय मराठी कविता.

स्वर्ग असा - मराठी कविता (ग. ल. ठोकळ)

असतील तेथे जिकडे तिकडे विखरुन पडली फुले


स्वर्ग असा - मराठी कविता (ग. ल. ठोकळ)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी ग. ल. ठोकळ (गजानन लक्ष्मण ठोकळ) यांची स्वर्ग असा ही लोकप्रिय मराठी कविता.



असतील तेथे जिकडे तिकडे विखरुन पडली फुले
असतील पक्षी झाडांवरती गोड गात बैसले

असेल तेथे वहात सुंदर दुधासारखी नदी
असतील डोलत हिरवी पिवळी कमळे पाण्यामधी

घरे तेथली सुरेख असतील चमकत सोन्यापरी
आत लाविल्या असतील रंगीबेरंगी तसबिरी

झगमग करीत असतील तिथले सुंदर दिवे
विझतही नसतील ते वार्‍याने जणु दुसरे काजवे

रोजच जत्रा भरत असावी तिथे नदीच्या तटी
असतील खाउ देत घेउनी पैसे दाटूमुटी

पंख लावुनी हिंडत वरती असतील तिथली मुले
असतील चालत ढगावरुनही टाकीत हळु पावले

असतील भारी रंगीत कपडे बाळांचे तेथल्या
शिवले असतील शेवंतीच्या गुंफुनिया पाकळ्या

खूप दागिने असतील त्यांनी अंगावर घातले
पुन्हा काढुनी नसतील कधीही पेटीमधी ठेविले

मुळीच नसतील त्यांच्या नशिबी अभ्यासाची बुके
मनास माने तितुके भटकत असतील ते सारखे

नसतील त्यांना ठोक द्यावया तिथे खाष्ट मास्तर
स्वर्ग असा मज बघावयाला मिळेल का लवकर

- ग. ल. ठोकळ (गजानन लक्ष्मण ठोकळ)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची