Loading ...

पर्‍यांचे गाणे - मराठी कविता (ग. ल. ठोकळ)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी ग. ल. ठोकळ (गजानन लक्ष्मण ठोकळ) यांची पर्‍यांचे गाणे ही लोकप्रिय मराठी कविता.

पर्‍यांचे गाणे - मराठी कविता (ग. ल. ठोकळ)

चल चल धरतीवर उतरू, छुम छुम छननन नाच करू


पर्‍यांचे गाणे - मराठी कविता (ग. ल. ठोकळ)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी ग. ल. ठोकळ (गजानन लक्ष्मण ठोकळ) यांची पर्‍यांचे गाणे ही लोकप्रिय मराठी कविता.



चल चल धरतीवर उतरू
छुम छुम छननन नाच करू
मी पहिली ही दुसरी
मी दुसरी ही तिसरी
सुंदर पंख हळू पसरू
छुम छुम छननन नाच करू

रात पडे चांद चढे
ओरडती रातकिडे
हलती डुलती तालतरू
छुम छुम छननन नाच करू

गवत किती मउ हिरवे
चल मिळवू हळु तळवे
लगबग लगबग हात धरू
छुम छुम छननन नाच करू

गगन वरी नाच करी
जग अवघे फेर धरी
नाच आमुचा होय सुरु
छुम छुम छननन नाच करू

घ्या गिरकी घ्या फिरकी
पूर्व दिशा हो भुरकी
दहिवर दिसता परत फिरू
छुम छुम छननन नाच करू

- ग. ल. ठोकळ (गजानन लक्ष्मण ठोकळ)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची