Loading ...

बकुळीची फुले - मराठी कविता (ग. ल. ठोकळ)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी ग. ल. ठोकळ (गजानन लक्ष्मण ठोकळ) यांची बकुळीची फुले ही लोकप्रिय मराठी कविता.

बकुळीची फुले - मराठी कविता (ग. ल. ठोकळ)

छाया गर्द सुरेख गार हिरवी शोभे तुझी पालवी


बकुळीची फुले - मराठी कविता (ग. ल. ठोकळ)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी ग. ल. ठोकळ (गजानन लक्ष्मण ठोकळ) यांची बकुळीची फुले ही लोकप्रिय मराठी कविता.



छाया गर्द सुरेख गार हिरवी शोभे तुझी पालवी
सो सो गर्जत वाहुनी गदगदा वारा तुला हालवी

भोती कुंपण दाट त्यावरुनही विस्तारल्या डाहळ्या
झाला भूमिवरी किती खच तरी; पाने फुले पाकळ्या

पुष्पांचे झुबके किती लहडले प्रत्येक फांदीवरी
त्यांचा गंध चहूकडे पसरला वर्णू किती माधुरी

छोटे गोंडस पांढरे सुम तुझे हुंगू किती मी तया
छोट्या सुंदर पाकळ्या कितितरी येती न मोजावया

उद्यानात अनंत वृक्ष फुलले त्यांची सुगंधी फुले
घेतो जो न करांत तोच सुकती पस्तावतो त्यामुळे

पुष्पे वेचुनिया तुझी जर तया मी ठेविली गुंफुनी
त्यांचा गंध अनंत काळ टिकतो जाती न कोमेजुनी

पुष्पांच्या तव ओंजळीत तरुवरा डोक्यावरी ठेवितो
यावज्जीव असो शिरावर तुझी छाया असे इच्छितो

- ग. ल. ठोकळ (गजानन लक्ष्मण ठोकळ)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची