Loading ...

होड्या - मराठी कविता (हेमंत जोगळेकर)

होड्या (मराठी कविता) - ज्येष्ठ मराठी कवी हेमंत जोगळेकर यांची एक उत्कट प्रेमसदृश भावना मांडणारी प्रसिद्ध मराठी कविता होड्या.

होड्या - मराठी कविता (हेमंत जोगळेकर)

खरं तर रूढार्थाने ही प्रेमकविता नाही, पण तरीही होड्या ही कविता एक उत्कट प्रेमसदृश भावना मांडते


होड्या

खरं तर रूढार्थाने ही प्रेमकविता नाही, पण तरीही ती एक उत्कट प्रेमसदृश भावना मांडते. या कवितेचा नायक आहे एक मुलगा. घड लहान नाही आणि धड मोठाही नाही, अशा आडनिड्या वयाचा. प्रेमाचे देहस्वी आणि मनस्वी पडसाद आत्ता कुठे त्याच्या कानावर अंधुक पडू लागले आहेत.

अशातच एक दिवस त्यांच्याकडे पाहुणे येतात. त्यांच्यासोबत असते एक तरुण मुलगी. पहाता क्षणीच ती मुलगी त्याला आवडते. पण ही आपल्याला आवडलीय, हे त्याला स्वतः लाही कळत नाही. प्रेमभावना लख्ख कळण्याचं त्याचं वयही नसतं. तो मग मी मोठा आहे, मला हेही येतंय आणि तेही येतंय, चार प्रकारच्या होड्या करता येतायत... असं म्हणत रहातो... थोडक्यात, इंप्रेशन मारत राहतो.

पाहुणे येतात तसे जातात. फार काहीच घडत नाही. तो काहीच बोलत नाही, तीही त्याची दखल घेत नाही... त्याला लागून राहतं.... मनाची उलघाल होत राहते.... पण ते ही का होतंय ते कळत नाही.

आणि मग येतो कवितेचा शेवट; हे जे 'न समजणारं' काहीतरी आहे, ते शब्दांत मांडू पहाणारा...

पाऊस ना, पडलाच नाही
पाणी ना, वाह्यलंच नाही

या कवितेचं एक वैशिष्ट्य आहे. तिचा ‘जर्म’ कळला नाही तर ती कळतच नाही. तो कळला तर मात्र तिच्यातली ओळन् ओळ लख्ख उलगडत जाते, पटत जाते... कारण असा अनुभव आपल्याला प्रत्येकाला कधी ना कधी आलेला असतो!



होड्या

हेमंत जोगळेकर

मला पुष्कळ होड्या येतात, बंबी होडी, नांगरी होडी, शिडाची आणि साधी होडी बिट्ट काहीतरी म्हणत होता, तो नेहमीच काहीतरी म्हणतो म्हणा, कॉफी तर सगळेच प्यायलो ती चालवीत आली होती म्हणे गाडी. बंबी होडी, नांगरी होडी, शिडाची आणि साधी होडी बोलणं तर बोलायचंच असतं. सगळेच काय काय बोलत होते, माझ्याशी नाही, पण ती ही चिक्कार बडबडली, पुष्कळजण होते, मी बोललोच नाही काही. बंबी होडी, नांगरी होडी, शिडाची आणि साधी होडी चिंकू कुत्रा गाडीत होत आँव-याँव, इकडे धाव-तिकडे धाव तिच्याशी तर फारच गोडीत होता तीही भलतीच गोडीत होती बंबी होडी, नांगरी होडी, शिडाची आणि साधी होडी दास अंकलनी मला विचारला पहिलाच प्रश्न दुसऱ्या वेळेला मी सांगितलं म्हणा दोनदा पण ती म्हणाली, “पप्या, तुम्ही कमालच करता!” बंबी होडी, नांगरी होडी, शिडाची आणि साधी होडी कॉफी तर तिनंच दिलीन तेव्हा मी नि गंधेकाका चेस खेळत होतो फरसाणसुद्धा तिनंच आणलंन एकदा घेतलं, दुसऱ्यांदा नाही म्हणालो बंबी होडी, नांगरी होडी, शिडाची आणि साधी होडी दारापर्यंत सगळेच गेलो तीही म्हणाली, ‘बराय अंकल, बराय आँटी टाटा बिट्ट, टाटा चिंकू’ नंतर म्हणालीच नाही काही बंबी होडी, नांगरी होडी, शिडाची आणि साधी होडी पाऊस ना, पडलाच नाही पाणी ना, वाह्यलंच नाही होड्या ना, सोडल्याच नाहीत होड्या ना, केल्याच नाहीत पण मला पुष्कळ होड्या येतात बंबी होडी, नांगरी होडी, शिडाची आणि साधी होडी

हेमंत जोगळेकर यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची