
कवी गोकुळ कुंभार यांची विठ्ठल भक्तीस समर्पित पाडुरंग पांडुरंग ही मराठी कविता.
पांडुरंग पांडुरंग ऐकता तुझे नाव देवा पुरता मी झालो दंग पांडुरंग हरी देवा पांडुरंग घेता मुखी नाव तुझे देवा मना उठती तरंग पांडुरंग हरी देवा पांडुरंग कबीरांचे ते दोहे जनाईंच्या ओव्या ऐकता तुकोबांचे अभंग मन होई दंग पांडुरंग पांडुरंग तुझा लागो मला छंद गजर किर्तनाचा होई टाळ विणा चिपळ्यात भजनात तुझ्या देवा साथ देई मृदुंग पांडुरंग देवा पांडुरंग गोकुळचा कान्हा द्वारकेचा तो राणा माझा सखा श्रीहरी होऊनी विठु माऊली सुखी लेकरा करी पांडुरंग हरी देवा पांडुरंग पांडुरंग तुझ्या नामात देवा होई मी दंग पांडुरंग पांडुरंग हरी पांडुरंग