
डॉ. गणेश तरतरे यांची लाकडाचे फासे ही कविता.
तो फासे टाकत होता लाकडाचे फासे कुणाच्या हाडाचे नव्हते फासे मायेने माखलेले फासे नियतीने मढवलेले तो एकटाच रममान अगम्य अद्भुत गूढ तॊ फासे न्याहाडत होता फेकत होता, रचत होता. रचना, रचना कसली? आडव्या उभ्या लाकडांची, की घरंगडणाऱ्या फाश्याची? फासे रचना करतात आणि लाकडाची केवळ चिता रचली जाते