बाबासाहेबांची पत्रकारिता (पुस्तकाचे प्रकाशन)

बाबासाहेबांची पत्रकारिता (पुस्तकाचे प्रकाशन) - विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या बाबासाहेबांची पत्रकारिता या पुस्तकाचे प्रकाशन.
बाबासाहेबांची पत्रकारिता (पुस्तकाचे प्रकाशन)
बाबासाहेबांची पत्रकारिता (पुस्तकाचे प्रकाशन).
विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या बाबासाहेबांची पत्रकारिता या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील महात्मा फुले वाड्यात करण्यात आले.

समाजात प्रबोधनातून बदल घडवून आणता येऊ शकतो, यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ठाम विश्वास होता. त्या प्रबोधनासाठी त्यांनी पत्रकारितेचा मार्ग अवलंबिला. त्यासाठी त्यांनी वृत्तपत्रीय कार्य सुरु केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता ही न्यायाची पाठराखण करणारी होती; आजच्यासारखी न्यायाधीशाच्या भूमिकेत जाऊन सनसनाटी निर्माण करणारी नव्हती.

बाबासाहेबांची पत्रकारिता या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील महात्मा फुले वाड्यात करण्यात आले
बाबासाहेबांची पत्रकारिता या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील महात्मा फुले वाड्यात करण्यात आले.

राष्ट्र, समाज यांच्या उन्नतीची आणि हिताची बाजू घेऊन त्यांनी पत्रकारिता केली. असे प्रतिपादन आध्यात्मिक गुरु विद्यावाचस्पती विद्यानंद ह्यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यावाचस्पती विद्यानंद ह्यांनी “बाबासाहेबांची पत्रकारिता” या शीर्षकाखाली लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाच्यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेकडे फारसे गांभीर्याने आणि अभ्यासाच्या दृष्टीकोनातून बघितले गेलेले नसल्याचे दिसून आल्याने “बाबासाहेबांची पत्रकारिता” ह्या पुस्तकाचे लेखक विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी ह्या विषयाची निवड केल्याचे नमूद केले.

बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ह्या पुस्तकाचे प्रकाशन करताना सावित्रीबाईंच्या लहानग्या लेकी
बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता ह्या पुस्तकाचे प्रकाशन करताना सावित्रीबाईंच्या लहानग्या लेकी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पत्रकारितेतील योगदानाचा विचार करून त्यावर “विद्यावाचस्पती विद्यानंद” ह्यांनी त्यांचा त्या काळातील प्रयासपूर्ण प्रवास अत्यंत नेमकेपणाने शब्दबद्ध केला आहे.

“बाबासाहेबांची पत्रकारिता” या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील महात्मा फुले वाड्यातील महात्मा ज्योतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळयासमोर सावित्रीबाईंच्या लहानग्या लेकींच्या हस्ते संपन्न झाले. पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यास विविध क्षेत्रांतील नामवंत उपस्थित होते.

संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

1 टिप्पणी

  1. फार छान.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.