समांतर - मराठी कविता

समांतर, मराठी कविता - [Samantar, Marathi Kavita] प्रविण पावडे यांची मराठी कविता समांतर.
समांतर - मराठी कविता
समांतर (मराठी कविता), चित्र: हर्षद खंदारे.
प्रविण पावडे यांची मराठी कविता समांतर.

आपल्या दोघांतील अंधुक रेष ना तू कधी ओलांडली ना मी कधी ती मोडली यावरूनच समाजाने आपल्या नात्याची समीकरणे मांडली इतरांना उदाहरणं म्हणून सांगू लागली काळानुरुप आपणही ती त्यांच्यानुसार स्विकारली आणि चालत राहिलो एकमेकांना समांतर कधीच न जुळण्यासाठी मनोमन जपलेली

- प्रविण पावडे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.